निर्भय पहाट / 7 वर्षांनंतर मिळाला निर्भयाला न्याय; निर्भयाची आई म्हणाली - आजचा सूर्य निर्भयाच्या नावे, देशातील महिला आणि मुलींचे आभार

नवी दिल्ली : 7 वर्षे 3 महिने आणि 4 दिवसानानंतर ती पहाट आली, जेव्हा निर्भया खरंच हसली. शुक्रवारी सकाळी साडे पाच वाजता तिच्या सर्व दोषींना फाशी देण्यात आली. दोषींना एकत्र तिहार जेलमध्ये फासावर लटकावले गेले.


16 डिसेंबर 2012 च्या रात्री दिल्लीमध्ये सहा नराधमांनी निर्भयासोबत दुष्कृत्य केले होते. एकाने तुरुंगात आत्महत्या केली, दुसरा अल्पवयीन असल्यामुळे तीन वर्षानंतर सुटला. उरलेले चौघे - मुकेश, अक्षय, विनय आणि पवन आपल्या मृत्यूच्या 2 दोन तास अधीपर्यंत रडत क्षमेची याचना करत होते. शेवटी विजय निर्भयाचाच झाला.


निर्भयाची आली म्हणाली - आजचा सूर्य मुलीच्या नावे...


आरोपींना फाशी दिल्यानंतर निर्भयाच्या आई आशा देवी यांनी मुलीच्या फोटोला आलिंगन दिले आणि म्हणाल्या - आज तुला न्याय मिळाला. आजचा सूर्य मुलगी निर्भयाच्या नावे आहे, देशातील मुलींच्या नावे आहे. मुलगी जिवंत असती तर मी एका डॉक्टरची आई म्हणून ओळखले गेले असते. आज निर्भयाच्या आईच्या नावाने ओळखले जाते. 7 वर्षांच्या लढ्यानंतर आज माझ्या मुलीच्या आत्म्याला सहनती मिळेल. आता महिलांना सुरक्षित वाटेल. आम्ही सुप्रीम कोर्टाला विनंती करतो की, त्यांनी गाइडलाइन जारी करावी. जेणेकरून अशा आरोपींनी प्रकरणांमध्ये दोषी शिक्षेपासून वाचण्याच्या युक्त्या लढाऊ शकाऊ नये.


आजचा दिवस निर्भया दिवस म्हणून साजरा केला जावा - आशा देवी...


आशा देवी म्हणाल्या की, "7 वर्षांच्या लढ्यानंतर आज माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळेल. विश्वास होता की, आरोपींना फाशी होईल आणि देशातील मुलींना, संपूर्ण देशाला न्याय मिळेल. आजचा दिवस देशातील मुलींच्या नावे, निर्भयाच्या नावे. आजचा दिवस निर्भया दिवस म्हणून लक्षात ठेवला जाईल." यापूर्वी दिल्ली हायकोर्टाने फाशी रोखण्याची याचिका फेटाळली तर आरोपीचे वकील एपी सिंह सुप्रीम कोर्टात गेले. यावेळीही आशादेवी या पूर्ण विश्वासाने म्हणाल्या होत्या, 'आरोपींना खूप वेळ दिला गेला, पण फाशी टाळण्यासाठी अनेक याचिका दाखल केल्या गेल्या. आज त्यांची याचिका दिल्ली हायकोर्टाने रद्द केली. आता आम्ही सुप्रीम कोर्टात जात आहोत. तेथेही दोषींची याचिका फेटाळली जाईल. आज सकाळी दिशींना फाशी होईल.'


एपी सिंहचे खळबळजनक वक्तव्य...


सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळल्यानंतर एपी सिंहने मीडियाला फटकारले. ते रिपोर्टिंगवर प्रश्न करत म्हणाले - एका आईसाठी तुम्ही सात वर्षे नाचत फिरत आहात. मग या मूळच्या आई, आई नाहीये का. की ही आठ वर्षांपेक्षा कमी वयाची एखादी व्हिक्टिम आहे. ही चोराच्या आईची बाब आहे तर त्या कारणावर जा की, रात्री 12.30 वाजेपर्यंत का माहित नव्हते की, मुलगी कुठे आहे. हे सोडून द्या. पुन्हा गोष्टी वाढतील. या वक्तव्यावर सुप्रीम कोर्टात असलेल्या एका महिला ऍक्टिव्हिस्टने हरकत व्यक्त केली आणि वकील एपी सिंह यांना आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागायला सांगितले.


36 वर्षे 5 महिन्यांपूर्वी एकत्र 4 दोषींना फाशी दिली गेली होती...


निर्भया केसच्या 36 वर्षे 5 महिन्यांपूर्वी 25 ऑक्टोबरला 1983 ला पुण्याच्या येरवड़ा सेंट्रल जेलमध्ये राजेंद्र जक्काल, दिलीप सुतार, शांताराम जगताप आणि मुनव्वर शाह यांना एकत्र फासावर दिले गेले होते. हे सर्व जानेवारीमध्ये 1976 ते मार्च 1977 च्या दरम्यान 10 सीरियल किलिंगचे दोषी होते.