कोरोना / केरळ हायकोर्टाने ऑनलाइन दारू विक्रीची याचिका फेटाळली, याचिकाकर्त्याला लागला दंड

कोच्चि : केरळच्या एका व्यक्तीने दारूची ऑनलाइन विक्री सुरु करण्यासाठी केरळ हायकोर्टाचा दरवाजा वाजवला. शुक्रवारी कोर्टाने सुनावणीदरम्यान याचिका फेटाळत नाराजी व्यक्त केली आहे. कोर्टाने याचिकाकर्त्याला 50 हजार रुपयांचा दंडदेखील लावला आहे. हे पैसे मुख्यमंत्री सहाय्य्यता कार्यासाठी दिन आताहवद्यात द्यावी लागेल. कोर्ट म्हणाले, ते केवळ जनहिताच्या याचिकांवर विचार करतात. याचिकाकर्त्याने आपल्या वैयक्तिक हितासाठी कोर्टात याचिका दाखल केली होती, ज्याची निंदा केली गेली पाहिजे.


याचिका करणाऱ्या व्यक्तीचा युक्तिवाद होता, 'कोरोनामुळे दारूच्या दुकानात होणाऱ्या गर्दीपासून वाचण्यासाठी याची होम डिलिव्हरी केली गेली पाहिजे. यामुळे पिणारे गर्दीच्या संपर्कात येण्यापासून वाचू शकतील. अलूवाच्या राहणारे याचिकाकर्ते जी ज्योतिषने याचिकेमध्ये म्हणले होते की, असाच धोका इतर लोकांनादेखील आहे. यामुळे हायकोर्टाने राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाला आदेश द्यावा की, दारूची ऑनलाइन विक्री सुरु करावी.


देशात कोरोनामुळे 4 जणांचा मृत्यू, 276 संक्रमित...


कोरोना व्हायरसमुळे जगातील अनेक देश लॉकडाउन केले गेल्याची घोषणा केली आहे तर अनेक देश असा करण्याचा विचार करत आहेत. सरकार आपल्या नागरिकांना गर्दीपासून वाचण्याचे कडक निर्देश दिलेले आहेत. भारत सरकारने जनता कर्फ्यूची घोषणा केली आहे. देशात कोरोना व्हायरसमुळे 4 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 276 पेक्षा जास्त संक्रमित झाले आहेत. केरळमध्ये शनिवारी सकाळपर्यंत कोरोना व्हायरसचे 17 रुग्ण आढळले आहेत.


Popular posts
“मोदीजी, तुम्ही सेलिब्रिटी खेळाडूंऐवजी गरीब मजूर, शेतकरी, डॉक्टरांशी चर्चा केली असती तर…”
एकजुटीने कोरोनाचा अंधार मिटवूया; पंतप्रधान मोदींचा देशाला संदेश
देशात कोरानाचा चौथा बळी : जर्मनीवरून परतलेल्या वृद्धाचा पंजाबमध्ये मृत्यू; अधिकाऱ्यांच्या देखरेखीत केले अंत्यसंस्कार
पिंपरी-चिंचवड करांना आनंदाची बातमी; पिंपरी-चिंचवड होत आहे कोरोना मुक्त
दिव्य मराठी विशेष / आता पीएचडीच्या संशाेधनाचे होणार मूल्यमापन, समाजोपयोगी असेल तरच देण्यात येईल अभ्यासकाला पदवी