कोरोनाच्या संकटात देशात व्हेंटिलेटरची कमतरता : रोज किती व्हेंटिलेटर बनवू शकता; सरकारची कंपन्यांकडे विचारणा

नवी दिल्ली - ज्या वेेगाने देशात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत आणि त्यावर नियंत्रण झाले नाही तर व्हेंटिलेटर्सची मोठ्या प्रमाणात उणीव जाणवू शकते. केंद्राच्या वतीने आरोग्य महासंचालकांनी दोन दिवसांपूर्वी व्हेंटिलेटर बनवणाऱ्या आणि आयात करणाऱ्या कंपन्यांंसोबत एक बैठक घेतली होती आणि व्हेंटिलेटरच्या स्थितीचा आढावा घेतला होता. कंपन्यांनी सांगितले की, व्हेंटिलेटर्सचा सध्या तेवढा साठा नाही, जेवढा देशाला हवा आहे. सरकारने कंपन्यांना विचारले की, रोज किती व्हेंटिलेटर्सचे उत्पादन करता येईल? केंद्राने राज्यांना निर्देश दिलेत की, त्यांनी जास्तीत जास्त व्हेंटिलेटर्सची व्यवस्था करावी. तज्ञांचे म्हणणे आहे की, कोरोनाच्या ८० टक्के रुग्णांना सौम्य संसर्ग होता, त्यांना घरीच वेगळे ठेऊन ठीक करता येऊ शकते. केवळ पाच टक्क्यांनाच आयसीयू अाणि व्हेंटिलेटर सुविधेची गरज भासते.


सध्या किती व्हेंटिलेटर :


> 30 हजार व्हेंटिलेटर सध्या देशात उपलब्ध


> 80% व्हेंटिलेटर-आयसीयू खासगी रुग्णालयांत


सरकारने काय उपाय केले?


> सरकारने आवश्यक वैद्यकीय उपकरणांवरील आयातीस बंदी घातली आहे. कंपन्यांना व्हेंटिलेटर्सचे उत्पादन वाढवायला सांगितले आहे. मात्र, देशात जे व्हेंटिलेटर्स बनवले जातात त्यांचे पार्ट‌्स चीनमधून येतात. यामुळे व्हेंटिलेटर्सच्या उत्पादनात अडचणी येत आहेत.


२०० कोटी रुपयांचे मार्केट


> लाइफलाइन बिज प्रायव्हेट लिमिटेडचे एमडी विनित आचार्य सांगतात की, देशात सुमारे दोनशे कोटी रु.चे वार्षिक व्हेंटिलेटरचे मार्केट आहे.


> गेल्या वर्षी देशात सुमारे ४००० व्हेंटिलेटर्स विकले गेले. त्यात ५२ टक्के नवे आणि ४८ टक्के वापरलेल्या व्हेंटिलेटर्सचा समावेश आहे.